रिपोर्टर नूरखान
प्रभाग १८ (ब) : सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी उत्स्फूर्त पाठिंब्याचे वातावरण.
अमळनेर : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ (ब) मधील सर्वसाधारण महिला राखीव जागेसाठी अनिता विनोद लांबोळे या येत्या शनिवारी, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्या नामांकनासाठी विविध भागांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मोठ्या संख्येने नागरिक व समर्थक उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाडा कॉलनी रुबजी नगर, कंजरवाडा, शिवम नगर, संत रोहिदास नगर, मरिमाता नगर, बहादरपूर नाका, संताजी चौक, भोईवाडा, माळीवाडा, अमलेश्वर नगर, शहालम नगर तसेच परिसरातील इतर भागांतील तरुण, तरुणी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि बिरजू नानांप्रती प्रेम व आपुलकी बाळगणाऱ्या मित्रपरिवारातील सदस्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
रुबजी नगर परिसरात सकाळी १० वाजता समर्थकांनी एकत्र येऊन अनिता लांबोळे यांना उत्स्फूर्त पाठिंबा द्यावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
गतकाळात अनिता लांबोळे यांच्या पतींच्या रूपाने परिचित असलेले विनोद उर्फ बिरजू लांबोळे यांनी प्रभागात अनेक विकासकामे, सामाजिक उपक्रम आणि जनसंपर्क यांमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला होता. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून प्रभागातील महिलांसह नागरिकांमध्ये अनिता लांबोळे यांच्या उमेदवारीबाबत उत्सुकता आणि पाठिंबा वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.




