Raver – Shakil Shaikh
मौलाना अबुल कलाम आजाद सार्वजनिक वाचनालय कर्जोद तालुका रावेर या संस्थे तर्फे दर वर्षी प्रमाणे या वर्षी ही शैक्षणिक, साहित्यिक,कवी,सामाजिक,राजनैतिक,व विविध क्षेत्रातील बंधू- भगिनीसाठी ” मौलाना अबुल कलाम आजाद, सावित्रीबाई फुले/फातिमा बी शेख राज्यस्तरीय पुरस्कार हा प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे हे 15 वे वर्ष आहे. हा कार्यक्रम भव्यदिव्य होणार आहे या पुरस्कारासाठी शिक्षक, साहित्यिक कवी आरोग्य सेवक सेविका विविध क्षेत्रातील कर्मचारी व बंधू भगिनींना आवाहन करण्यात येते की आपल्या शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक कार्याचा प्रस्ताव दिनांक : 30 डिसेंबर 2025 पर्यंत पाठवायचा आहे.
तरी शिक्षक, साहित्यिक,कवी, पोलीस कर्मचारि आदि बंधू-भगिनींनी सदर कार्याचा प्रस्ताव पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे. त्यात शैक्षणिक, साहित्यिक व सामाजिक, कार्यातही हातभार लावत आहेत आशा गुरुमाऊलींचा गौरव अवश्य व्हावा, ही या संस्थेचेची भूमिका आहे. याच अनुषंगाने प्रस्ताव मागविले जात आहेत. या पुरस्काराचे स्वरुप असे आहे की, आकर्षक स्मृतीचिंन्ह, मानपञ, शाल, पेन आदी राहील जळगाव जिल्ह्यातील मान्यवरांचे हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. सदर प्रस्ताव एका प्रतीत व एक रंगीत छायाचित्रासह पाठवावे. पता:–मौलाना अबुल कलम आजाद सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय कर्जेद ता रावेर जि जळगाव

अधिक माहितीसाठी
अध्यक्ष शकील अब्दुल शेख मो. नं. 9823336417,
आशिष पाठक मो.नं. 8668824672
इमरान खान जामनेर मो. नं
8087063766
मोहसीन सर जळगाव
9271444786
हाजी सरफराज शेख मो. नं.
8668970643
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या अध्यक्ष यांच्या वतीने करण्यात आले आहे.




