रिपोर्टर नूरखान
नागरिक आणि स्थानिक नेत्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद.
अमळनेर :- आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात उमेदवारांच्या चर्चेला वेग आला असताना नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र उर्फ जितू ठाकूर यांचे नाव प्रबळ दावेदार म्हणून पुढे येत आहे. नागरिकांसह विविध राजकीय नेत्यांकडून मिळणारा प्रतिसाद हा ठाकूर यांच्या वाढत्या लोकप्रियतेची द्योतक मानला जात आहे.
शहरातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर पत्रकारितेद्वारे सातत्याने काम करणारा, लोकांमध्ये राहून मदत करणारा आणि स्पष्टवक्ता अशी ओळख जितू ठाकूर यांची आहे. मागील काही वर्षांत स्वच्छता, रस्ते-विकास, पाणीपुरवठा तसेच क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. शहराच्या मूलभूत सुविधांशी संबंधित मुद्द्यांवर त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे “काम करणारा नगराध्यक्ष हवा असेल, तर जितू ठाकूर” असे मत अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.
ठाकूर यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान दिले असून, युवकांना प्रोत्साहित करण्याबरोबरच शहराच्या विकासासाठी काही धोरणात्मक कल्पनाही पुढे मांडल्या आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीचे आणि संघटन कौशल्याचे कौतुक काही पक्ष नेत्यांनीही केले आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी सकारात्मक वातावरणात चर्चेत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील गल्ल्या–बोळांपासून सामाजिक माध्यमांपर्यंत ठाकूर यांच्या नावाची चर्चा वाढत असून, नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेत ते आघाडीचे उमेदवार म्हणून उदयास येत आहेत.




