रिपोर्टर नूरखान
अमळनेर: तालुक्यातील तरुण, तडफदार आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले परेश रवींद्र उदयवाल यांनी प्रभाग क्रमांक 4 मधून नगरसेवक पदासाठी आज आपला नामांकन अर्ज सादर करून निवडणूक रणसंग्रामाला सुरुवात केली आहे. नामांकन भरतांना त्यांच्यासोबत विविध समाजघटकांतील मान्यवर, तरुण कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली.
परेश उदयवाल हे अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. परिसरातील लहान–मोठ्या समस्या सोडविणे, शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविणे, तसेच सर्वसामान्यांच्या अडचणींना तत्परतेने हाताळणे यामुळे त्यांनी लोकांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. गरज पडली की कोणत्याही क्षणी धावून जाणारा, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा असा त्यांचा स्वभाव असल्याने, तरुण पिढीत त्यांना मोठी लोकप्रियता आहे.नागरिकांतही त्यांच्या उमेदवारीबाबत उत्साहाचे वातावरण असून, “नगरसेवक तरुण तडफदारच हवा” अशी मागणीही अनेक ठिकाणी ऐकू येत आहे. उच्च शिक्षण घेतलेले आणि विकासाची स्पष्ट दृष्टी असलेले परेश उदयवाल यांनी प्रभाग क्रमांक 4-ब मधून अधिकृतपणे आपले नामांकन पत्र सादर केले. नामांकन दाखल करतांना परिसरातील नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले आणि आगामी निवडणुकीत भक्कम पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.
परेश उदयवाल यांनीही संवाद साधतांन प्रभागातील मूलभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, तसेच युवकांसाठी उपयुक्त उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले. “प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि प्रत्येक नागरिकापर्यंत प्रशासनाच्या सुविधा पोहोचवणे ही माझी प्राथमिकता असेल,” असे त्यांनी सांगितले.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 4 मध्ये राजकीय वातावरण रंगू लागले असून, उदयवाल यांच्या उमेदवारीमुळे तरुणाईत विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरुस्ती, तसेच युवकांसाठी उपयुक्त उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले. “प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि प्रत्येक नागरिकापर्यंत प्रशासनाच्या सुविधा पोहोचवणे ही माझी प्राथमिकता असेल,” असे त्यांनी सांगितले.
निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर प्रभाग क्रमांक 4 मध्ये राजकीय वातावरण रंगू लागले असून, उदयवाल यांच्या उमेदवारीमुळे तरुणाईत उत्सुकता निर्माण झाली आहे.




