रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध प्रभागांमधून उमेदवारांची नावे जाहीर होत आहेत. मात्र काही प्रभागांतील काही संभाव्य उमेदवारांच्या विरोधात दोन नंबरचे व अवैध धंदे चालवण्याचे आरोप असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक पातळीवर मिळालेल्या माहितीनुसार, काही उमेदवारांकडे दारूची बेकायदा विक्री, गुटखा, सट्टा-मट्टा तसेच वाळू व गौण खनिजांचे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे बोलले जाते. अशा पार्श्वभूमीवर नागरिकांनी मतदान करताना उमेदवारांच्या चारित्र्य, कामगिरी आणि प्रामाणिकतेचा बारकाईने विचार करावा,.
नागरिकांच्या मते, अवैध धंद्यात गुंतलेल्या व्यक्तींना जर जनतेनेच नगरसेवक म्हणून निवडून दिले, तर अशा धंद्यांना शासकीय पाठबळ मिळण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे शहराचा विकास, जनतेच्या समस्या आणि प्रशासनातील पारदर्शकता यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
“५०० किंवा १००० रुपयांच्या मोबदल्यात मतदान करून पाच वर्षांच्या भवितव्याशी तडजोड करू नका. समाजाच्या दुःख–सुखात उभा राहणारा, स्वच्छ प्रतिमेचा आणि प्रामाणिक कार्य करणारा उमेदवारच नगरसेवक म्हणून निवडावा,” असा आमच्या अधिकृत हेडलाईन पोस्ट न्यूज पोर्टलच्या माध्यमातून संदेश नागरिकांनी दिला आहे.
आगामी निवडणुका पारदर्शक आणि स्वच्छ व्हाव्यात, तसेच नगरसेवक पदाचा गैरवापर होऊ नये, यासाठी मतदारांनी जागरूक राहणे गरजेचे आहे.




