रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- तालुक्यातील पांझरा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा पुन्हा सुरू आहे. मांडळ पुलाजवळ गेल्या काही दिवसांपासून वाळू माफियांचा वाळू टप्पा, मंडळ मध्ये वाळूमाफ्यांचा राज पुन्हा सुरू झाल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
नुकतेच नवीन उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे यांनी कार्यभार स्वीकारला असला, तरी त्यांच्या कार्यक्षेत्रात वाळू माफिया पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसत आहे. पांझरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टर आणि डंपरद्वारे वाळू उपसा सुरू असून, हे सर्व काही दिवसांपासून उघडपणे सुरू असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या अवैध वाळू उपशामुळे ग्रामसेवक, तलाठी आणि कोतवाल,पोलिस पाटील यांनी लक्ष देण्याची गरज आहे . गावातील रस्ते खराब झाले असून, रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर आणि डंपरच्या वाहतुकीमुळे मोठा आवाज होतो. त्यामुळे नागरिक, लहान मुले, त्रस्त होत आहेत.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, महसूल विभाग आणि पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. “नवीन उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे साहेब या वाळू माफियांना आळा घालतील का?” असा प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चेला आला आहे.




