रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- तालुक्यातील कंडारी गावच्या सरपंच सौ. ज्योत्स्ना संतोष लोहार या सामाजिक, शैक्षणिक आणि महिला सक्षमीकरणासाठी अखंड कार्य करणाऱ्या लोकनेत्या म्हणून ओळखल्या जातात. “मी खोटं बोलणार नाही, दिखावा करणार नाही, माझं ध्येय एकच — तुमच्यासोबत विकासाच्या मार्गावर चालायचं आहे,” असे त्यांचे नेहमीचे स्पष्ट विचार आहेत.
बेटी बचाव – बेटी पढाव मोहिमेतून राज्यस्तरीय गौरव . जळगाव जिल्ह्यात ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या मोहिमेअंतर्गत महिलांच्या शिक्षण व सन्मानासाठी त्यांनी सातत्याने जनजागृती कार्यक्रम राबवले. त्यांच्या उत्कृष्ट कामाची दखल घेत जळगावचे C.O. रुबल अग्रवाल यांनी प्रस्ताव सादर केला. या कार्याबद्दल त्यांना ६ डिसेंबर २०१८ रोजी लोकसभेच्या त्या वेळच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कोरोना काळात मानवतेची सेवा.कोविड-१९ च्या महामारीच्या काळात त्यांनी स्वतःच्या खर्चाने १७ ते २० वयोगटातील १७०० मुलींना सेनेटरी पॅड घरपोच देण्याचे काम केले. कठीण परिस्थितीतही महिलांच्या आरोग्याबद्दलची त्यांची संवेदनशीलता समाजासाठी प्रेरणादायी ठरली.
सामाजिक समानतेचा आदर्श उपक्रम.सरपंच म्हणून काम करताना सौ. लोहार यांनी दलित समाजातील विधवा महिलेला पाण्याच्या बोरिंग भूमिपूजनाचा मान देऊन सामाजिक एकतेचा सुंदर संदेश दिला. या घटनेची तालुक्यात सर्वत्र प्रशंसा झाली आणि विधवा महिलांनाही शुभकार्यांत स्थान मिळावे हा विचार रुजला.
राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान.महिला व बालविकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस व मंत्री श्री. मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. मोबाईलच्या दुष्परिणामावर जनजागृती. सन २०२३-२०२४ या कालावधीत त्यांनी नवलभाऊ प्रतिष्ठान, नवलनगर यांच्या सहकार्याने गावातील जिल्हा परिषद शाळेत मुलांमध्ये मोबाईल व्यसनाविरुद्ध जनजागृती कार्यक्रम घेतले.
सौ. ज्योत्स्ना संतोष लोहार यांच्या कार्यातून समाजसेवा, महिला सक्षमीकरण, शिक्षण आणि ग्रामविकास यांचा संगम दिसून येतो. त्यांच्या नेतृत्वामुळे कंडारी ग्रामपंचायत आज सामाजिक परिवर्तनाची प्रेरणादायी दिशा ठरली आहे.




