रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ६ मधून समाजसेवक दीपक भाऊ चौगुले यांनी नगरसेवक पदासाठी आपली इच्छुकता व्यक्त केली आहे.
दीपक भाऊ चौगुले हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक तसेच सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर काम करत आहेत. प्रभागातील गोरगरीब, वंचित घटकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेत आले आहेत. नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणारे, नेहमी मदतीसाठी तत्पर असणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.
स्थानिक पातळीवर रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा आणि सार्वजनिक सोयीसुविधांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविला आहे. हॉस्पिटलमधील रुग्णसेवा असो, पोलीस स्टेशनमधील जनतेच्या तक्रारी असो किंवा इतर नागरी प्रश्न , प्रत्येक ठिकाणी त्यांनी तातडीने मदतीचा हात पुढे केला आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील नागरिकांमध्ये “आपला माणूस, जनतेचा नगरसेवक” अशी ओळख निर्माण केलेले दीपक भाऊ चौगुले हे आता अधिकृतपणे सर्वसाधारण नगरसेवक पदासाठी इच्छुक आहे.




