रिपोर्टर नूरखान
अमळनेर -: खान्देश शिक्षण मंडळ संचलित प्रताप कॉलेज (स्वायत्त), अमळनेर येथील गणित विषयाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. वंदना पोपटराव भामरे यांना त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल महात्मा ज्योतिराव फुले शिक्षक परिषद मार्फत दिला जाणारा राष्ट्रीय महात्मा फुले शिक्षक पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.
या पुरस्कारामध्ये प्रशस्तिपत्र, ट्रॉफी आणि ₹५०,०००/- रोख रक्कम यांचा समावेश आहे. पुरस्कार वितरण सोहळा २८ ऑक्टोबर २०२५ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे पार पडला.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव, डॉ. विजय तुंटे, डॉ. धीरज वैष्णव, डॉ. अमित पाटील, ग्रंथपाल दीपक पाटील, डॉ. जितेंद्र पाटील, तसेच प्रा. विजय साळुंखे, कमलाकर पाटील, प्रा. रागिणी सैंदाणे, प्रा. सुचित्रा रत्नपारखी, प्रा. नेहा पाटील, महेंद्र चौधरी, मिलिंद नेवे, नितीन सोनार आणि सुरसिंग यांनी त्यांचे अभिनंदन केले.
डॉ. भामरे यांच्या या यशामुळे प्रताप कॉलेज तसेच अमळनेर तालुक्याचा मान उंचावला आहे.




