रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- सामाजिक कार्यकर्ते नविद शेख यांनी प्रभाग क्रमांक ४ (ब) मधून नगरपरिषद निवडणूक लढवावी, अशी मागणी या प्रभागातील नागरिक, तरुण मंडळी, तसेच ज्येष्ठ नागरिकांनी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून समाजकारणात सक्रिय असलेले तडफदार, जिंदादिल व्यक्तिमत्व म्हणून नविद शेख हे शहरात परिचित आहेत. त्यांचा मित्रपरिवार शहरातील काना-कोपऱ्यापर्यंत पसरलेला असून, सर्व समाजातील लोकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत.
प्रभाग क्रमांक ४ (ब) मध्ये कुरेशी मोहल्ला, जैन मंदिर मागील परिसर, जिनगर गल्ली, बेलदार मोहल्ला, फरशी रोड, अंदरपुरा, मामाजी व्यायामशाळा परिसर, कोष्टी वाडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन परिसर, मटण मार्केट परिसर, राम मंदिर परिसर, सिद्धार्थ चौक आणि चुना घाणी परिसर यांचा समावेश आहे.
नविद शेख यांनी समाजाच्या प्रश्नांवर नेहमीच आवाज उठवला आहे. संजय गांधी निराधार योजना अंतर्गत महिलांना मदत, नगरपरिषदेतील नागरी समस्यांवरील पाठपुरावा, तसेच वीज कंपनी व ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवांबाबतचा संघर्ष ही त्यांची कार्यशैली जनतेला चांगली परिचित आहे.
नविद शेख म्हणाले, “जनता जनार्दनाने ठरविले तर मी आनंदाने उमेदवारी स्वीकारेल. मी समाजाप्रती असलेली बांधीलकी कायम ठेवून काम करत राहिलो आहे आणि पुढेही करत राहीन.”
सध्या त्यांनी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवायची हे स्पष्ट नसले तरी प्रभाग क्रमांक ४ (ब) मधून उमेदवारीचे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे त्यांच्या राजकीय निर्णयाकडे शहरातील सर्व पक्षांचे लक्ष लागून आहे.




