रिपोर्टर नूरखान
अमळनेर -: आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमळनेर शहरातील प्रामाणिक आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर (उर्फ जितू ठाकूर) यांनी नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून ठाकूर हे सामाजिक आणि जनसेवेसाठी तत्पर कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. सामाजिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आणि विश्वास निर्माण झाला आहे. गोरगरिबांच्या सुख-दुःखात सहभागी होणारा, कोणत्याही परिस्थितीत जनतेच्या सेवेसाठी पुढे धाव घेणारा असा त्यांचा स्वभाव आहे.
गरीब कुटुंबातून आलेले जितू ठाकूर यांनी समाजकारणातून राजकारणाकडे प्रामाणिकपणे वाटचाल केली आहे. “प्रामाणिक दृष्टिकोन, जनतेचा विश्वास आणि विकासाचे वचन” या ब्रीदवाक्याने ते नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरतले आहे.
स्थानिक पातळीवर अनेक सामाजिक उपक्रम, जनसंपर्क मोहिमा आणि विकासात्मक प्रयत्नांमुळे ठाकूर यांची प्रतिमा एक लोकाभिमुख नेतृत्व म्हणून निर्माण झाली आहे. आगामी निवडणुकीत त्यांची उमेदवारी अधिकृतपणे जाहीर होण्याची शहरात उत्सुकता आहे.




