रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- तालुक्यातील तरुण, तडफदार आणि समाजहितासाठी नेहमी तत्पर असलेले परेश रवींद्र उदेवाल हे प्रभाग क्रमांक ४ (ब) मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून परेश उदेवाल हे सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या कामात सक्रिय आहेत. कोणतेही सुख-दुःख असो, ते नेहमी लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. रात्री असो वा दिवस, कोणत्याही वेळी लोकसेवेसाठी तत्पर असणारा हा तरुण परिसरात आदराने ओळखला जातो.
उच्च शिक्षण घेतलेले, नम्र, प्रेमळ आणि निर्मळ स्वभावाचे परेश उदेवाल हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचा सन्मान करणारे आहेत. आपल्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाची अडचण ओळखून तिचे निराकरण करण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेतात.
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ४ मधून परेश रवींद्र उदेवाल यांनी नगरसेवकपदासाठी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे. “तरुणाईला एक संधी द्या” या भावनेतून त्यांनी नागरिकांचे आशीर्वाद आणि पाठबळ मागितले आहे.




