रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- तालुक्यातील काही तलाठ्यांविरोधात पैशांच्या माध्यमातून नोकरी मिळवल्याचे आरोप समोर येत असून, त्यात तलाठी जितेंद्र पाटील यांच्याबाबत विशेष चर्चा सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तलाठींना पंचनामा करण्याचे आवश्यक तांत्रिक ज्ञान नसल्याची आणि स्वतःचे नाव इंग्रजीत लिहिण्याचीही अडचण असल्याची माहिती समोर आली आहे.तालुक्यातील नागरिकांनी सांगितले की, प्रशासनाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या तलाठ्यांना मूलभूत कागदपत्रे व पंचनामा प्रक्रियेबाबत माहिती नसल्याने गावपातळीवर अनेक कामे प्रलंबित राहतात. यामुळे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
याप्रकरणी जिल्हाधिकारी यांनी संबंधित तलाठींची सखोल चौकशी करून पात्रता, शैक्षणिक पात्रता व कामकाजाची पडताळणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. काही ठिकाणी अशा प्रकारे “पैशांच्या आधारे” नोकरी मिळवणाऱ्या व्यक्तींनी सरकारी कामकाजात गोंधळ निर्माण केल्याची चर्चा असून, प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे.
प्रशासनाकडे यातक्रारीची अधिकृत पुष्टी देण्यात येणार आहे. जिल्हा अधिकारी यांनी चौकशी करावी अशी मागणी होत आहे.




