रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- अमळनेर शहरातील परिचित सामाजिक कार्यकर्ते आणि शिरीष दादा मित्र परिवाराचे कट्टर समर्थक मो. इमरान आरिफ भाया तेली यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि माजी मंत्री, आमदार अनिलदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यांनी हा निर्णय घेतला.
या प्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते मा. आ. जिशान बाबा सिद्दीकी व आ. सना नवाब मलिक यांच्या हस्ते मो. इमरान भाया यांचा पक्षप्रवेश संपन्न झाला. या प्रसंगी माजी मंत्री व आमदार अनिलदादा पाटील, नजीब मुल्ला, ऍड. नाझेर काझी, मा. आ. कुषी भूषण साहेब रावदादा पाटील तसेच पक्षाचे अन्य प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
इमरान आरिफ भाया हे अमळनेर शहर काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष, माजी नगरसेवक आणि माजी आरोग्य सभापती शफी भाया यांचे सुपुत्र आहेत. समाजसेवेतील त्यांचे योगदान उल्लेखनीय राहिले असून, त्यांच्या प्रवेशामुळे पक्ष संघटनाला अमळनेर परिसरात नवी उभारी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.




