रिपोर्टर नूरखान
करिअर कौन्सिलिंग सेंटरचा उपक्रम.
अमळनेर : खान्देश मंडळ संचलित प्रताप महाविद्यालयातील करिअर कौन्सिलिंग सेंटर तर्फे ७ नोव्हेंबर रोजी ‘वंदे मातरम’ गीताला १५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आणि विद्यार्थी दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या प्रसंगी ‘वंदे मातरम’ या प्रेरणादायी व ऐतिहासिक गीताचे लेखक बँकिंमचंद्र चॅटर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेंबर १९०० रोजी प्रतापसिंग हायस्कूल, सातारा येथे प्रथम प्रवेश घेतल्याच्या स्मरणार्थ त्यांच्या प्रतिमेलाही अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. हर्षवर्धन जाधव व उपप्राचार्य डॉ. कल्पना पाटील यांच्या हस्ते माल्यार्पण करून झाले. त्याचप्रमाणे भारतरत्न डॉ. सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. अमित पाटील, ग्रंथपाल दीपक पाटील तसेच विद्यार्थ्यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी करिअर कौन्सिलिंग सेंटरचे प्रमुख डॉ. विजय तुंटे यांनी बँकिंमचंद्र चॅटर्जी, डॉ. आंबेडकर आणि डॉ. सी. व्ही. रमण यांच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती दिली.
कार्यक्रमास डॉ. आर. सी. सरवदे, डॉ. जितेंद्र पाटील, डॉ. माधव भुसनर, डॉ. विलास गावित, डॉ. ज्ञानेश्वर मराठे, प्रा. विजय साळुंखे, डॉ. किरण भागवत, प्रा. रोहन गायकवाड, डॉ. बालाजी कांबळे तसेच दिलीपदादा शिरसाठ, पराग रवींद्र पाटील, गोपाळ पाटील, गिरीश पाटील, धीरज चौधरी, आकाश कोळी, नंदू पाटील, योगेश चिंचोरे, अतुल धनगर, अनिकेत अहिरे आणि दिनेश चिंचोरे आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते.




