रिपोर्टर नूरखान
अमळनेर: राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धुमकुळ सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर, सिंधी कॉलनी परिसरातील प्रभाग क्रमांक ३ मधून युवा उद्योजक रोहितजी गुरुनामल बठेजा यांनी नगरसेवक पदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
या उमेदवारीमुळे सिंधी समाजात उत्साह आणि चर्चेचं वातावरण निर्माण झालं आहे. खरेतर, समाजातील युवा उद्योजकांनी राजकारणात पुढे येणे ही काळाची गरज आहे, जेणेकरून गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या समस्या समजून घेऊन त्यांचे निराकरण त्वरित करता येईल.
रोहितजी बठेजा हे विनम्र, नम्र आणि लोकाभिमुख स्वभावाचे व्यक्तिमत्त्व आहे. समाजसेवेची आवड, तरुणाईसाठी आदर्श दृष्टिकोन आणि विकासाकडे असलेला प्रामाणिक दृष्टीकोन यामुळे ते प्रभाग क्रमांक ३ मधून सर्वसाधारण मतदारसंघातून नगरसेवक पदाचे इच्छुक उमेदवार ठरत आहेत.




