रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- उच्च वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतरही आपल्या मायभूमीत राहून निरामय सेवेचा ध्यास घेतलेल्या डॉ. परिक्षीत श्रीरामजी बाविस्कर यांनी अल्पावधीतच लोकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे व नम्र स्वभावामुळे ते जनतेच्या पहिल्या पसंतीस उतरले असून, हजारो रुग्णांसाठी ते देवदूत ठरले आहेत.
अमळनेर नगरपरिषदेच्या होणाऱ्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी डॉ. बाविस्कर यांचे नाव इच्छुक उमेदवारांच्या यादीत प्राधान्याने पुढे आले आहे. समाजसेवेची नाळ जपणारे आणि निरपेक्ष भावनेने कार्य करणारे हे वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व राजकारणाला सेवाकार्याचे माध्यम मानत आहेत.
अमळनेर हे संतश्रेष्ठ सखाराम महाराजांची पावनभूमी, साने गुरुजींची कर्मभूमी, तसेच मंगळदेव मंदिर, वाडी संस्थान यांसारख्या धार्मिक व सांस्कृतिक वारशामुळे ओळखले जाते. अशा शहरात लोकसहभाग, पारदर्शकता आणि गुणवत्ता यांवर आधारित प्रशासन उभारण्याचा डॉ. बाविस्कर यांचा मानस आहे.
त्यांच्या नियोजित कार्ययोजनेत — युवा पिढीसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र, आधुनिक अभ्यासिका व क्रीडा संकुल. ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार केंद्र व मनोरंजन सुविधा. माता-महिलांसाठी तसेच बालकांसाठी विकासात्मक उपक्रम.आरोग्य सेवांचा बळकटीकरण व व्याधिमुक्त अमळनेर निर्माण.
“शहराचा विकास हा केवळ इमारतींनी नव्हे, तर आरोग्य, शिक्षण, संस्कार आणि जनसहभाग यांमधून साध्य होतो,” असे मत डॉ. बाविस्कर यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या सेवाभावी दृष्टिकोनामुळे नागरिकांमध्ये नवीन आशा निर्माण झाली असून, अमळनेर शहरात सकारात्मक बदलांची नांदी सुरू झाल्याचे जनतेतून व्यक्त होत आहे.




