रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- प्रताप नगर ते गलवाडे रोड वार्ड क्र 6 परिसरातील पोलावची सर्व लाईट बंद आहे. रोडवरील रस्त्यावरील लाईट गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे परिसरात संपूर्ण अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
अंधारामुळे वाहनधारकांना अपघाताचा धोका वाढला आहे, तसेच चोरीसारख्या घटनांचेही प्रमाण वाढण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे. स्थानिक नागरिकांनी अनेकदा अमळनेर नगरपरिषद इलेक्ट्रिशन विभागाकडे तक्रार केली असूनही अद्याप काहीही हरकत घेतली नाही.
नागरिकांचा प्रश्न आहे की, भावी नगरसेवक आणि माजी नगरसेवक यांच्या नजरेतून हा अंधार दिसत नाही का? निवडणुका जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावर बॅनरबाजी आणि प्रचार करतांना, नागरिकांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनास विनंती केली आहे की, गलवाडे रोडवरील सर्व लाईट तातडीने दुरुस्त करून सुरु करण्यात यावेत, अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार देण्यात येईल.




