रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- शहरातील प्रमुख व्यावसायिक भाग असलेल्या हाशिमजी कॉम्प्लेक्स परिसरात पत्र्याचे शेड टाकून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले असून, त्यामुळे नागरिक आणि पादचाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी, गर्दी आणि रस्त्यावरील अडथळ्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
स्थानिकांनी अनेक वेळा नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने नागरिकांचा संयम सुटू लागला आहे. नागरिकांमध्ये चर्चा आहे की, काही दुकानदारांवर “वरदहस्त” असल्यानेच अतिक्रमण कायम ठेवले जात आहे काय, असा संशय व्यक्त होत आहे.
अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष! मिळालेल्या माहितीनुसार, अलीकडेच अतिक्रमण विभागाने हाशिमजी कॉम्प्लेक्स परिसरात भेट देऊन काही अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले होते. मात्र काही दिवसातच संबंधित दुकानदारांनी पुन्हा पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण वाढवले आहे. अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
नागरिकांचा संताप वाढला.या अतिक्रमणामुळे रस्त्यावर पार्किंगची समस्या गंभीर झाली असून, पादचाऱ्यांना जाण्यासाठीही जागा उरलेली नाही. वाहतूक पोलिस आणि नगरपालिका अधिकारी यांच्याकडून कोणतीही समन्वयात्मक कारवाई होत नसल्याने लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार,“नगरपालिका केवळ निवडक अतिक्रमणावरच कारवाई करते. प्रभावशाली दुकानदारांवर कारवाई टाळली जाते. हे अन्यायकारक आहे.”
आंदोलनाचा इशारा हाशिमजी कॉम्प्लेक्स परिसरातील व्यापाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की,“जर तात्काळ अतिक्रमण काढण्यात आले नाही, तर नगरपालिकेच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.”
प्रशासनाच्या कारवाईकडे लक्ष ?
अतिक्रमणमुक्त अमळनेरचे स्वप्न साकार होणार की प्रशासन पुन्हा ‘मौनधारण’ करणार, हा प्रश्न आता नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. नवीन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी या प्रकरणाकडे लक्ष देऊन अतिक्रमण केलेले. दुकानदारांनची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, आणि कायमस्वरूपी अतिक्रमण कडून टाकावी.अशी व्यापारांची मागणी आहे.




