रिपोर्टर नूरखान
राज्याध्यक्ष नागेशजी कंडारे यांच्या हस्ते नव्या कार्यकारिणीची घोषणा.
अमळनेर – अखिल महाराष्ट्र सफाईगार व चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना शाखा अमळनेरचा फलक अनावरण सोहळा नगरपरिषद अमळनेर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी संघटनेचे राज्याध्यक्ष मा. नागेशजी कंडारे व राज्य कोषाध्यक्ष धनराज पिवाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नव्या कार्यकारिणीची घोषणा व पदाधिकारींची नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
कार्यकारिणीत अनिल सुभाष बेंडवाल यांची नाशिक विभाग अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. किशोर संगेले यांची अमळनेर शाखा सचिव म्हणून नियुक्ती, तसेच यश लोहेरे यांना उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. याशिवाय कार्यकारिणीत शिवचरण संगेले कोषाध्यक्ष, रमेश कलोसे उपाध्यक्ष,अनिल बाविस्कर ,सहसचिव, नरेश घोगले कार्याध्यक्ष, सुरेश चव्हाण प्रसिद्धी प्रमुख, राम कलोसे संपर्क प्रमुख, सागर पवार सहकोषाध्यक्ष आणि अक्षय बेडवाल संघटक,अशी नियुक्ती करण्यात आली.
राज्याध्यक्ष नागेशजी कंडारे यांनी नव्या कार्यकारिणीचे अभिनंदन करून संघटनेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी संघटनेने एकजुटीने काम करून कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमास सोमचंद संदाशिव, प्रसाद शर्मा, अविनाश संदाशिव, तसेच अमळनेर नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक मा. संतोष जाधव, मा. किरण कंडारे, मा. संतोष माणिक साहेब आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.




