धुळे | काकर वाहिद
धुळे महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराला चरम सीमेवर नेऊन ठेवणाऱ्या आयुक्त अमिता दगडे पाटील यांची झालेली बदली धुळेकरांसाठी निश्चित दिलासादायक आहे. महिला ही संवेदनशील असते तिचे मन हळवे सुजन शील असते. म्हणून महिला अधिकारी पुरुषांच्या तुलनेत अधिक प्रामाणिक कृतिशील असंतात हा समज या बाईने ठोकरून लावला, त्याची फळे मात्र धुळेकर जनता रोज भोगत आहे, रस्त्यांच्या खड्ड्याने झालेल्या चाळण मधून तो मार्ग शोधतो, पडतो, आणि महानगरपालिकेला प्रचंड शिव्या देत मार्गस्थ होतो, शहरात तर पाचशे मीटरवर प्रचंड घाणीचे साम्राज्य कचऱ्याचे साचलेले ढीग हे तर नेहमीच दृश्य दुर्गंधीमुळे तोंडाला रुमाल लावून नरक यातना भोगत धुळेकर तळमळत राहिला, पावसाने जरा शिडकावा केला तरी रस्त्यांच्या नद्या होताना धुळेकर पाहत होता. पेठ भाग ,कलेक्टर ऑफिस , सिव्हिल हॉस्पिटल, कमलाबाई कन्या शाळा, महानगरपालिकेच्या दारात तलाव साचले ,दुचाकी बंद झाल्या महिला पुरुष सर्वच हतबल होत राहिले, त्यांचे हाल कोणीच रोखले नाहीत कारण या आयुक्तांना हि कामे महत्त्वाची नव्हती, मांडवली कामाचे पाचपटीचे जास्तीचे दर आकारून निविदा मंजूर करणे त्याचे पंधरा टक्के कमिशन मोजून घेणे, कामाला वाव नसताना दोन वर्षात तीन-तीन दा रस्त्यांवर रस्ते टाकणे जनतेच्या निधीचा अक्षरशः अपव्य या बाईने केला. त्यामुळे गेल्या दोन वर्षापासून अमिता दगडे पाटील यांच्या कार्य काळात दोन हजार कोटीच्या कामाला चालना दिली गेली ,पण दोन हजार कोटीचे काम धुळे शहरात कुठेच दिसली नाहीत. रस्त्यांच्या कामावरती हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले ते रस्ते आहेत की खड्डे आहेत हा प्रश्न धुळेकरांना सातत्याने सतावत राहिला., वीस लाखात होणारी दीपमाळ दीड कोटीत बांधली गेली 20 कोटीचे एलईडी लाईट धुळे शहरात लावले पण धुळे शहर मात्र अंधारातच राहिले पांजरा चौपाटीलगत दोन एकरावर 60 कोटी रुपये खर्च करून बांधलेले गार्डन कोरडे टाक पडले, टक्केवारी दिली की विषय संपला, स्वच्छतेच्या नावाखाली तीन तीन वेळा टेंडर मंजूर करण्यात आले प्रत्येक ठेकेदाराला हाताशी धरून टक्केवारीचा मलिदा प्रचंड प्रमाणात खाल्ला गेला पण धुळे शहरात स्वच्छता कुठे दिसली नाही उलट स्वच्छतेच्या नावास खाली देखील प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मलिदा देऊन स्वच्छतेच्या बाबतीत धुळे महानगरपालिकेचा खोटा क्रमांक आणला गेला.
हाल अपेष्टा आणि नागरी सुविधांनी व्याकुळ झालेला धुळेकर भ्रष्टाचाराच्या कराल दाढेतून आपली कधी सुटका होईल अशी भाबडीआशा ठेवून होता. परंतु वेळोवेळी याच आयुक्तांनी आपली बदली होऊ नये म्हणून मंत्र्यांना अडीच खोके मोजले, आणि धुळे महानगरपालिकेला आपल्या टक्केवारीच्या रूपात भ्रष्टाचाराचा अड्डा बनवला. आज या आयुक्तांची राज्यशासनाने बदली केल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून सातत्याने धुळेकरांच्या समस्या घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलने करून आयुक्तांना नेहमी धारेवर धरणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महानगरपालिका प्रवेशद्वारा जवळ डफ लावून फटाके फोडून भ्रष्टाचारी आयुक्तांची बदली झाल्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला, यापुढे धुळे महानगरपालिकेत भ्रष्टाचार कराल तर खबरदार, शिवसैनिक अंगावर कपडे ठेवणार नाही, एवढे आसुड ओढु आता महानगरपालिकेला लुटताना धुळेकर सहन करणार नाही, एवढी इज्जत अधिकाऱ्यांची घेऊ. धुळे शहरातील बायका पोरे त्यांचे नातेवाईक भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या अंगावर थुंकतील, अधिकाऱ्यांनो तुम्ही पैसे तर कमवाल पण या पैशांनी तुम्हाला इज्जत कधीच कमवता येणार नाही, गाठ आमच्याशी आहे असा इशारा देत यावेळी शिवसेनेच्या वतीने आयुक्तांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत फटाके फोडण्यात आले याप्रसंगीयाप्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी महानगरप्रमुख धीरज पाटील, प्रशांत भामरे सुनील पाटील डॉ. अनिल पाटील, अण्णा फुलपगारे, शिवाजी शिरसाळे, आनंद जावडेकर, महादू गवळी, डॉ.संजय पि़गळे, अजय चौधरी, निलेश कांजरेकर, विष्णू जावडेकर, नितीन देशमुख, अनिल शिरसाट, सागर निकम,इशतियाक अ़सारी, अनिल पाटील, शुभम रणधीर, योगेश पाटील, सुरज भावसार, तेजस सपकाळ, सचिन शिंदे आदी उपस्थित होते.




