रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी आता मालेगाव महानगरपालिकेचे उपआयुक्त गणेश शिंदे यांची अमळनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही बदल प्रक्रिया प्रशासनिक फेरबदलाचा एक भाग असून, लवकरच नवीन मुख्याधिकारी गणेश शिंदे अमळनेर येथे कार्यभार स्वीकारणार आहेत.




