Wednesday, January 28, 2026
Wednesday, January 28, 2026
Wednesday, January 28, 2026
spot_img
spot_img
A venture of Pen First Media and Entertainment Pvt. Ltd
Member of Working Journalist Media Council Registered by - Ministry of Information and and Broadcasting, Govt. Of India. New Delhi
HomeMarathi२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं...

२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; ‘असा’ आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल.

रिपोर्टर नूरखान

अमळनेर :- सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारी २०२५ पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.
येत्या २ डिसेंबर २०२५ रोजी यासाठी मतदान होईल तर ३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकीत १ कोटीहून अधिक मतदार मतदान करतील. या निवडणुका इलेक्ट्रॉनिक मशीन आणि बॅलेट युनिट वापरण्यात येतील अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.

याबाबत राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाकडून घेण्यात येत आहे. ६८५९ सदस्य यातून निवडून येणार आहे. १४७ नगरपंचायती आहेत त्यापैकी ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे. नगरपंचायतीत एका प्रभागात २ जागा असतात. उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील. एका उमेदवाराला जास्तीत जास्त ४ प्रभागात अर्ज दाखल करता येतील. उमेदवारी अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. जर एखाद्याने जातवैधतेसाठी अर्ज केला असेल तर त्याची पावती लागेल. मतदान केंद्रनिहाय याद्या ७ नोव्हेंबरला प्रकाशित होईल. १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार आहेत असं त्यांनी सांगितले.

तसेच कोकण विभाग – २७, नाशिक – ५९, पुणे – ६०, नागपूर – ५५ अशा नगरपरिषदा,नगरपंचायतीच्या निवडणुका होतील. १३ हजार ३५५ मतदान केंद्रावर ही निवडणूक होईल. २८८ अध्यक्षपद, ३८२० प्रभाग, ६८५९ सदस्य यासाठी ही निवडणूक होणार आहे. मतदान केंद्रातील इमारतीत मोबाईल नेता येईल परंतु मुख्य कक्षात मोबाईल नेता येणार नाही. ६६ हजार निवडणूक अधिकारी, कर्मचारी यासाठी काम करत आहेत अशी माहितीही दिनेश वाघमारे यांनी दिली आहे.

असा आहे कार्यक्रम (Maharashtra Local Body Election 2025 Date)

१० नोव्हेंबर २०२५ – उमेदवारी अर्ज दाखल करणे
२१ नोव्हेंबर २०२५ – उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची तारीख
मतदानाचा दिवस – २ डिसेंबर २०२५
मतमोजणी – ३ डिसेंबर २०२५

दुबार मतदारांसाठी नवीन मोहिम.

दुबार मतदारांपर्यंत राज्य निवडणूक आयोगाचे कर्मचारी पोहचतील. मतदारांना मतदान केंद्रे आणि नाव शोधण्यासाठी खास APP बनवण्यात आले आहे. दुबार मतदारांसमोर डबल स्टार करण्यात आलेले आहेत. असा मतदार केंद्रावर आल्यानंतर त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्र घेतले जाईल. त्याला एकाच केंद्रावर मतदान करता येईल असं दिनेश वाघमारे यांनी म्हटलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular

You cannot copy content of this page

error: Content is protected !!