रिपोर्टर नूरखान
अमळनेर : जिल्हा युवक काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष महेश दगडू पाटील यांची स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसच्या जिल्हा निवड मंडळावर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
प्रदेशाध्यक्ष मा. हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या सूचनेनुसार व जिल्हाध्यक्ष मा. बाळासाहेब प्रदीपराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी जिल्हा निवड मंडळाची स्थापना करण्यात आली असून, नुकतीच या मंडळातील सदस्यांची यादी जाहीर झाली आहे.
महेश पाटील यांची दोन्ही समित्यांमध्ये सदस्य म्हणून निवड झाली असून, काँग्रेस उमेदवारांच्या निवड प्रक्रियेत हे मंडळ निर्णायक भूमिका पार पाडणार आहे.
या निवडीबद्दल महेश पाटील यांचे जिल्हाभरातून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.



                                    
