रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- राष्ट्रीय एकता दिनानिमित्त आज अमळनेर शहर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने “रन फॉर युनिटी” या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात शहराचे लोकप्रिय आमदार तथा माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून सहभागींचे मनोबल उंचावले.
या एकता धावेत शहरातील पोलीस कर्मचारी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट “राष्ट्रीय एकता, शिस्त व देशभक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवणे” असे ठेवण्यात आले होते.
उल्लेखनीय म्हणजे, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, अमळनेर येथील विद्यार्थी आणि शिक्षकवर्ग यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन या उपक्रमाला अधिक ऊर्जा दिली. शाळेचे संस्थापक अध्यक्ष नीरज अग्रवाल व मुख्याध्यापक विनोद अमृतकर यांनी स्वतः उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी “एक भारत, श्रेष्ठ भारत!” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि एकतेचा संदेश प्रत्येकाच्या हृदयात रूजला.




