रिपोर्टर नूरखान
अमळनेर : – येथील खाजगी शिक्षण विभागात मोठा आर्थिक घोळ झाल्याचे माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,खाजगी शिक्षण विभागातील एका संचालकाने मोठा गैरव्यवहार केल्याचे उघड झाले असून, संबंधित संचालक फरार झाल्याची माहिती मिळत आहे.
या प्रकरणाचा तपास नाशिक येथील आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरू करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शिक्षण विभागातील अनियमिततेची प्रकरणे उघड होत आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
अमळनेर परिसरात या घोटाळ्याची चर्चा चांगलीच रंगली असून, एका नामांकित शिक्षण संचालकाचे नाव पुढे येत असल्याची चर्चा सुरू आहे. अधिकृतरीत्या तपास पूर्ण झाल्यानंतर लवकरच संबंधित व्यक्तींची नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.




