रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व अमळनेर तालुका शहर विकास आघाडी पुरस्कृत भव्य पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा शहरातील कलागुरु मंगल कार्यालयात उत्साहात पार पडला. मेळाव्यास आमदार अनिल पाटील, माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी आमदार अनिल पाटील म्हणाले की, “आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार लढवल्या जाणार असून, जनतेच्या मनातील उमेदवारालाच तिकीट मिळेल.” त्यांनी जातीयवादाला थारा न देण्याचे आवाहन करत, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकारकडे विनंती केल्याचे सांगितले.
माजी आमदार साहेबराव पाटील म्हणाले, “अनिलदादा आणि मी एकत्र आलो तर अमळनेरमध्ये बिनविरोध निवडणूक होणं शक्य आहे.”
या मेळाव्यास शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भागवत पाटील, सूत्रसंचालन विनोद कदम, तर आभार प्रदर्शन संजय पवार यांनी केले.




