रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्ताने अमळनेर पोलीस स्टेशनतर्फे “वॉक फॉर युनिटी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.०० वाजता अमळनेर शहरातील महाराणा प्रताप चौक येथून सुरू होणार आहे.
या उपक्रमात अमळनेर शहर व तालुक्यातील नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्था, शासकीय अधिकारी व कर्मचारी, शाळा-महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी, पत्रकार आणि युवकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी केले आहे.
कार्यक्रमाचा उद्देश सामाजिक एकात्मता, बंधुता, सलोखा आणि राष्ट्रीय ऐक्याची भावना दृढ करणे हा आहे.




