रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- जळगांव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात मध्यरात्री रस्तालुटीसाठी धोकादायक व प्राणघातक शस्त्रे घेऊन थांबलेल्या सात जणांना चोपडा शहर पोलिसांनी जेरबंद केले. या कारवाईमुळे शहरात मोठा गुन्हा घडण्यापासून पोलिसांनी प्रतिबंध घातला आहे.
ही कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी, पोलीस अधीक्षक जळगाव, श्रीमती कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव विभाग, तसेच अण्णासाहेब घोलप, उपविभागीय पोलीस अधिकारी, चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एकनाथ भिसे, तसेच कर्मचारी पो. हर्षल पाटील, पो. संतोष पारधी, पो. ज्ञानेश्वर जवागे, पो. अजिंक्य माळी, पो. अमोल पवार, पो. मदन पावरा, पो. रविंद्र मेढे, पो. विनोद पाटील, चालक पो.किरण धनगर, पो. योगेश पाटील व पो. प्रकाश ठाकरे, यांनी सहभाग घेतला.
गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी हे वरिष्ठांच्या सूचनांनुसार करीत आहेत.
पोलिसांनी आरोपींकडून दोन तलवारी व एक रिकामे मॅगझीन असा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईनंतर परिसरात पोलिसांच्या दक्षतेचे कौतुक होत आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी .
दिलीपसिंह हरिसिंह पवार (३२) रा. नाथनगर, नांदेड, विक्रम बाळासाहेब बोरगे (२४) रा. वैजापूर, जि. संभाजीनगर,अनिकेत बालाजी सुर्यवंशी (२५) रा. नवामोंढा, नांदेड, अमनदीपसिंह अवतारसिंह राठोड (२५) रा. मगनपुरा, नांदेड, सहाम हुसेन मोहंम्मद अमीन (३३) रा. इतवारा, नांदेड, अक्षय रविंद्र महाले (३०) रा. भावसार गल्ली, चोपडा जयेश राजेंद्र महाजन (३०) रा. भाटगल्ली, चोपडा.
पोलिसांनी या सर्वांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईबद्दल चोपडा पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.




