रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- अमळनेर तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे कापूस, मका, सोयाबीन आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र गट) तर्फे प्रशासनाकडे तात्काळ नुकसानभरपाईची मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात अमळनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात प्रशासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदनावर तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. अशोक पवार, शहराध्यक्ष प्रशांत निकम, युवक तालुकाध्यक्ष योगेश शिसोदे, किसान सेल तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, महिला तालुकाध्यक्ष योजना पाटील, तसेच वासुदेव मामा, शांताराम कोळी, महेंद्र लोहार, कृष्णा पाटील, अनिल पाटील जानवे, संजय मधुकर पवार, हरीश लाड, चिंधू वानखेडे, वासुदेव पाटील, वसंत पाटील,यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी शासनापर्यंत पोहोचवून त्यांना तात्काळ दिलासा देण्याची मागणी केली.




