रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस २०२५ च्या औचित्याने जळगाव जिल्हा पोलीस दल व अमळनेर पोलीस स्टेशन तर्फे एकता दौडचे आयोजन करण्यात आले.
ही एकता दौड महाराणा प्रताप चौक येथून सुरू होऊन मंगळ ग्रह मंदिर येथे संपन्न झाली. कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर आमदार पाटील यांनी स्वतःही एकता दौडीत सहभाग घेतला.
या प्रसंगी मा. मुख्याधिकारी, नगरपरिषद अमळनेर, संबंधित अधिकारी व कर्मचारी, शहरातील प्रतिष्ठित नागरिक, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शासकीय कार्यालयांचे अधिकारी-कर्मचारी, महाविद्यालय व शाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माजी सैनिक, पत्रकार बांधव, वकील बांधव, तरुण मित्र परिवार, शांतता समिती सदस्य, महिला दक्षता समिती सदस्य, पोलीस पाटील, होमगार्ड तसेच भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी व मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य अशा एकूण ३०० ते ३५० नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
या एकता दौडीतून समाजात राष्ट्रीय एकात्मता, बंधुता आणि ऐक्याचा संदेश दिला गेला.




