रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- धरणगाव ते चोपडा मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम रखडलेले असून, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींकडून या विषयाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
अवकाळी पावसामुळे रस्त्यावरील खड्डे, चिखल आणि असमान पृष्ठभागामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. बस, दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघाताचा धोका देखील वाढला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर धरणगाव–चोपडा रस्त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, नागरिक प्रशासनाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “ संबंधित ठेकेदाराची वरिष्ठांना तक्रार करण्यात येईल संबंधित अधिकाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिलेले नाही. ठेकेदाराने काम अर्धवट ठेवले असून, जनतेचा जीव धोक्यात आहे.”
नागरिकांनी प्रशासन व शासनाला मागणी केली आहे की, या रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करून प्रवाशांना दिलासा द्यावा. अन्यथा मोठ्या प्रमाणावर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांनीही या प्रश्नावर ठाम भूमिका घ्यावी, अशीही भावना जनतेत व्यक्त होत आहे.




