रिपोर्टर नूरखान
ग्रामसेवकांनी प्रमाणपत्र पडताळणी आदेशाचे पालन केले नाही.
अमळनेर :- जिल्हा परिषद, जळगाव यांच्या निर्देशानुसार दिव्यांग ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांचे दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणी कॅम्प शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथे दिनांक १३ ते १७ ऑक्टोबर २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आला होता.
या संदर्भात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांच्या सूचनेनुसार सर्व तालुक्यांना आदेश जारी करण्यात आले होते की संबंधित दिव्यांग कर्मचारी यांनी मुळ प्रमाणपत्र व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून पडताळणी करून घ्यावी.
मात्र, अमळनेर तालुक्यातील काही ग्रामसेवकांनी या आदेशाचे पालन केले नाही, अशी माहिती समोर आली आहे. काही कर्मचारी अपंगत्व प्रमाणपत्रावर नोकरीचा लाभ घेत असूनही, त्यांनी प्रमाणपत्र पडताळणीसाठी उपस्थिती लावली नाही, असे समजते.
या पार्श्वभूमीवर, मुख्य कार्यकारी अधिकारी आढाळे साहेब यांनी दिलेल्या आदेशांचे पालन न केल्याने संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. तसेच, किती ग्रामसेवकांनी प्रत्यक्ष तपासणी केली आणि किती गैरहजर राहिले याचा अहवाल आता मागविण्यात येत आहे.
यासंदर्भात सर्व ग्रामविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आलेल्या आहे.
अमळनेर गटविकास अधिकारी नरेंद्र पाटील




