रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- तालुक्यात 26 ऑक्टोबर रोजी पासून झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वासरे, कळमसरे, मांडळ, वावडे, पाडळसरे, मारवड, जवखेडा, पिंपळी तसेच तालुक्यातील इतर अनेक गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
कापूस पिकासह इतर हंगामी पिकांचेही नुकसान झाले असून गुरांसाठी साठवलेला चारा देखील भिजल्याने शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्गावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
स्थानिक शेतकऱ्यांची दखल आमदार, खासदार, मंत्री तसेच मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी या परिस्थितीची दखल घेऊन तातडीने पंचनामा करावा व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती मदत व न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी केली आहे.




