रिपोर्टर नूरखान
अमळनेर (ता. अमळनेर, जि. जळगाव):
अमळनेर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर मोठा खड्डा पडलेला असून प्रवाशांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसांत या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे प्रवाशांचा अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
स्थानिक नागरिक आणि प्रवाशांच्या मते, स्टेशनवरील कर्मचारी व रेल्वे प्रशासनाने या बाबीकडे दुर्लक्ष केले आहे. या खड्ड्यामुळे वृद्ध, महिला आणि लहान मुलांसाठी प्रवास करणे धोकादायक ठरत आहे.
रेल्वे प्रशासनाने तात्काळ या खड्ड्याची दखल घेऊन त्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिक प्रवासी व नागरिकांनी केली आहे. अन्यथा एखादा गंभीर अपघात घडल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील.




