रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- शहरातील रामेश्वर नगर भागात श्री रायरेश्वर महादेव मंदिर उभारणीचा भूमिपूजन सोहळा आमदार अनिल पाटील यांच्या शुभहस्ते मंगलमय वातावरणात २४ ऑक्टोबर रोजी पार पडला. माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील व स्वप्नाताई विक्रांत पाटील यांच्या हस्ते महापूजा संपन्न झाली.
या प्रसंगी परिसरातील नागरिक, महिला व तरुण वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने सहभाग नोंदविला.
“या मंदिराच्या उभारणीमुळे परिसरात नवचैतन्य, श्रद्धा आणि एकात्मतेचा संदेश प्रसारित होईल,” असा विश्वास आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला माजी उपनगराध्यक्ष विनोद लांबोळे, माजी नगरसेवक प्रताप शिंपी, दादा पवार, रणजीत शिंदे, विनोद कदम, बाळू पाटील यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश शेटे यांनी केले, तर आभार मुकेश पाटील यांनी मानले.




