रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- तालुक्यातील मांडळ, मुडी, बाम्हणे आणि कळंबू परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक सुरू होती. या बेकायदेशीर वाळू तस्करीमुळे ग्रामस्थ त्रस्त झाले होते. अखेर आज ग्रामस्थांनी संयुक्तपणे धाडसी कारवाई करत मुडी-बोदर्डे परिसरातून वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर पकडले आणि ते मारवड पोलिसांच्या ताब्यात दिले.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरात दिवस-रात्र वाळू वाहतूक सुरू असल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. वाळू माफियांची गुंडगिरी वाढल्याने प्रशासनाचा धाक राहिलेला नाही, अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. मांडळ परिसरातून मोठ्या प्रमाणावर वाळू बाहेर जात असल्याने पर्यावरण आणि स्थानिक शेतीवरही परिणाम होत आहे.
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे “वाळू तस्करी तात्काळ बंद करण्यात यावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी” अशी मागणी केली आहे.




