रिपोर्टर नूरखान
अमळनेर : येथील उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांची पदोन्नती होऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाचे उपसचिव महेश वरूडकर यांनी २० तारखेला हा आदेश काढला आहे.
नितीनकुमार मुंडावरे हे कार्यतत्पर, शिस्तप्रिय आणि लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कार्यकाळात अमळनेर तालुक्यातील प्रशासन अधिक गतिमान झाले होते. त्यांनी हाताळलेल्या विविध प्रकरणांची सुनावणी तात्काळ केली गेली असून, कोणतेही दाखले प्रलंबित ठेवले गेले नाहीत. त्यामुळे नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास वाढला होता.
प्रशासनातील नियमित कामकाजात पारदर्शकता आणि कार्यक्षमतेसाठी त्यांची कार्यशैली विशेष गाजली. त्यांच्या निर्णयक्षमतेमुळे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागले. त्यांच्या पदोन्नतीचे अमळनेरमध्ये स्वागत होत असून, विविध सामाजिक, शासकीय व व्यावसायिक क्षेत्रातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मुंडावरे यांच्या जागी नवीन उपविभागीय अधिकारी म्हणून लवकरच नियुक्ती होण्याची शक्यता आहे.