रिपोर्टर नूरखान
नगरपरिषदेच्या इमारतीला आमदाराचे नाव देणे बेकायदेशीर – येवसेना शहरप्रमुख भरत पवार यांचा प्रशासनाला इशारा.
अमळनेर:- अमळनेर नगरपरिषद मालकीच्या गट नं. 123 मध्ये उभारण्यात आलेल्या व्यापारी संकुलाला विद्यमान आमदाराचे नाव देण्यात आला आहे. हा प्रकार पूर्णत बेकायदेशीर असल्याचा गंभीर आरोप येवसेना शहरप्रमुख भरत पवार यांनी केला आहे. त्यांनी नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रकारास विरोध दर्शवला आहे.
या व्यापारी संकुलाची उभारणी ही नगरपरिषदेच्या निधीतून व नगरपरिषदेच्या जागेवर करण्यात आलेली असून, सदर प्रकल्पाशी आमदारांचा काहीही संबंध नाही. असे असतानाही, राजकीय दबावाखाली सदर संकुलास आमदाराचे नाव दिले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, असे भरत पवार यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
नगरपरिषद अधिनियमांनुसार, नगरपरिषदेच्या मालकीच्या इमारती, संकुलांना फक्त महापुरुषांचेच नाव देणे कायदेशीर आहे. त्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधींच्या नावाचा वापर हा कायद्याच्या विरोधात असून, नगरपरिषदेच्या प्रशासनाने अशा राजकीय दबावाला बळी न पडता योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी केली गेली आहे.
भरत पवार यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर सदर बेकायदेशीर नाव हटवण्यात आले नाही, तर शासन दरबारी तक्रार दाखल करण्यात येईल. तसेच, प्रशासनाने आपली भूमिका लक्षात ठेवावी – ते कोणत्याही पक्षाचे प्रतिनिधी नसून, शासनाचे प्रतिनिधी आहेत, याचे भान ठेवावे, असेही त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले.
महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नगरपरिषदेच्या निधीतून व मालकीच्या जागेवर उभारलेल्या इमारतीला कोणत्याही राजकीय व्यक्तीचे नाव देणे हा कायद्याचा भंग आहे. हे नाव तत्काळ हटवून एखाद्या थोर महापुरुषाचे नाव द्यावे!
भरत पवार, शहरप्रमुख, येवसेना.