शकील अब्दुल शेख
भुसावळ–चित्तौडगड राष्ट्रीय महामार्गावरील पाल येथील मोरव्हाल फाटा हा अपघातांचा धोकादायक ठिकाण म्हणून ओळखला जात होता. मागील काही वर्षांत येथे ४ ते ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अनेक अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग आणि प्रशासनाकडे उपाययोजनांची मागणी केली होती, मात्र ती दुर्लक्षितच राहिली. अखेर या गंभीर समस्येची दखल आमदार अमोल भाऊ जावळे यांनी घेतली आणि सार्वजनिक बांधकाम विभागास तातडीने गतीरोधक बसवण्याचे आदेश दिले.
आमदार जावळे यांच्या सूचनेनंतर विभागाने त्वरेने हालचाल करत मोरव्हाल फाट्यावर स्पीड ब्रेकर व गतीरोधक बसवण्याचे काम सुरू केले असून, प्रत्यक्षात त्या कामास सुरुवात झालेली आहे. या कामामुळे भविष्यातील अपघात टळणार असून, रस्त्यावरील धोकादायकपणा लक्षणीयरित्या कमी होईल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला आहे.
कामाच्या वेळी भाजपा कार्यकर्ते गोमती बारेला, प्रदीप जाधव, सुरेश पवार, नंदकिशोर चव्हाण, विनय पवार, सूरज सराठे, राहुल धांडे, राहुल चव्हाण आदी उपस्थित होते.आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या दूरदृष्टीमुळे अखेर विभाग जागा झाला असून, पाल ग्रामस्थांचा जुना प्रश्न मार्गी लागला,*
पाल येथे अपघातग्रस्त मोरव्हाल फाट्यावर – आमदार अमोल जावळे यांच्या सूचनेनंतर गतीरोधक बसवण्याचे काम सुरू
RELATED ARTICLES