रिपोर्टर नूरखान
अमळनेर : नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन (ब) सर्वसाधारण मतदारसंघातून अफसानाबी मुख्तार खाटीक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी झालेली प्रचंड लोकसंख्येची उपस्थिती हे अमळनेर शहरात चर्चेचा विषय ठरले.
मुक्तार खाटीक हे गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष म्हणून कार्यरत असून समाजामध्ये त्यांचा प्रभाव मोठा आहे. त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमात मुस्लिम बांधवांबरोबरच मोठ्या संख्येने हिंदू बांधव आणि भगिनींची उपस्थिती दिसून आली , हे शहरातील हिंदू-मुस्लीम ऐक्याचे एक सुंदर उदाहरण ठरले.
‘विकासाचे, प्रगतीचे ध्येय ,स्वप्न पूर्ण करूया’ या ब्रीदवाक्याखाली घोषणाबाजी करत मुख्तार खाटीक यांच्या समर्थकांनी नगरपरिषद कार्यालय परिसरात जल्लोष केला.मुक्तार खाटीक हे अमळनेर शहरात दोन्ही समाजांमध्ये समान आदर मिळवणारे, शांततेचे व सौहार्दाचे प्रतीक मानले जातात. त्यांच्या अर्धांगिनी अफसाना बी. मुख्तार खाटीक या प्रभाग क्रमांक दोन (ब) सर्वसाधारण मतदारसंघातून नगरसेवकपदासाठी इच्छुक असून, या उमेदवारीमुळे निवडणुकीत रंगत येणार आहे.




