रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- अमळनेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने केलेल्या अत्यंत शिताफीच्या कारवाईत मोटारसायकल चोरी करणारे दोन इसम पकडण्यात आले असून त्यांच्या कडून तब्बल 24 चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. माहेश्वरी रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर चाळीसगाव परीमंडळ, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विनायकराव कोते यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
गुन्हेअमळनेर पोलिसांची मोठी कारवाई ,मोटारसायकल चोरी करणारे दोन इसम पोलिसांच्या जाळ्यात. शोध पथकातील पो.शरद काकळीज, पो. प्रशांत पाटील, गणेश पाटील, उंजवलकुमार म्हसके, नितीन मनोरे, उज्वल पाटील व हितेश बेहरे यांनी मिळून अमळनेर परिसरातील सी सी टीव्ही फुटेजचे विश्लेषण करून आरोपींचा शोध घेतला. या तपासात हिमंत रेंहज्या पावरा व अंबालाल भुरट्या खरडे, दोन्ही रा. सातपिंप्री, ता. शहादा, जि. नंदुरबार, यांना धडगांव येथील जंगल परिसरातून ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत दोन्ही आरोपींनी अमळनेर तसेच इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून अनेक मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्या कबुलीच्या आधारे सातपिंप्री ता. शहादा जंगल परिसरातून 24 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून, एकूण मुद्देमालाची किंमत अंदाजे ₹15,63,000/- एवढी आहे. जप्त करण्यात आलेल्या मोटारसायकलींमध्ये होंडा यूनिकॉर्न, होंडा शाइन, बजाज पल्सर, टीव्हीएस रायडर इत्यादी विविध कंपन्यांच्या वाहनांचा समावेश आहे.
या प्रकरणी अमळनेर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 308/2025, भा.दं.सं. कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास काशिनाथ पाटील ,सागर साळुंखे हे करीत आहेत.




