रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- अमळनेर येथे शिवसेनेचा निर्धार मेळावा पार पडला. या मेळाव्यात जिल्ह्याचे पालकमंत्री तथा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते गुलाबराव पाटील यांनी जोशपूर्ण भाषण करत कार्यकर्त्यांना नवचैतन्य दिले. यावेळी काही मुस्लिम बांधवांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षावर विश्वास दाखविला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. व्यासपीठावर माजी आमदार शिरीष चौधरी ,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुरेखाताई ,संजय पाटील(भूत बापू) सुरेश पाटील, प्रवीण पाटील, तसेच रियाज मौलाना आदीसह उपस्थित होते.
“शिवसेना ही संघटना आहे, पक्ष नाही”
आपल्या भाषणात पालकमंत्री पाटील म्हणाले, “शिवसेनेसोबत माझा प्रवास प्रमोद महाजन यांच्या सभेपासून सुरू झाला. तेव्हापासून मी एक विचार, एक झेंडा आणि एकच नेता वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे या यांच्यातत्त्वावर चालत आलो आहे.”
ते पुढे म्हणाले, “शिवसेना ही फक्त पक्ष नाही, ती संघटना आहे. कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर उभी असलेली ही शक्ती आहे.”
“चार तास झोपून २० तास काम करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कौतुक करताना पाटील म्हणाले, “राज्यातील विकासकामांसाठी झटणारा, चार तास झोपून २० तास काम करणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथ शिंदे.”
“अमळनेर पैशावर विकणारा गाव, पण आम्ही जात-पात मानत नाही”
स्थानिक राजकारणावर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटले, “अमळनेर हा पैशावर विकणारा गाव आहे. पण आम्ही जात-पात बघत नाही, जो काम करतो तोच निवडून येतो.”
“आम्ही मुस्लिमांचे शत्रू नाही” पाटील म्हणाले, “शिवसेना कोणाच्याही विरोधात नाही. आम्ही मुस्लिमांचे शत्रू नाही. समाजातील प्रत्येक घटकाने एकत्र येऊन विकासासाठी काम करायला हवे.”
काँग्रेसवर टीका करताना पाटील म्हणाले, “काँग्रेसने मुसलमानांना फक्त भांगर आणि केळी दिली, बाकी काही दिलं नाही.” त्यांनी आरोप केला की काँग्रेसने मुस्लिम समाजाचा केवळ मतांसाठी वापर केला.
मेळाव्यात कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. घोषणाबाजी,करून संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.




