रिपोर्टर नूरखान
अमळनेर – मराठी वाङमय वाङमय मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत ‘अभिजात मराठी’ पॅनलचे प्रमुख डॉ. अविनाश जोशी यांनी ‘परिवर्तन’ पॅनलचे प्रमुख शरद सोनवणे यांचा पराभव करत अध्यक्षपदी विजय मिळविला. या विजयाने अभिजात मराठी पॅनलला बहुमत मिळाले असून मंडळाच्या कार्यात नवचैतन्य येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या निवडणुकीत इतर विजयी उमेदवारांमध्ये विवेकानंद भांडारकर, डॉ. रवींद्र कुलकर्णी, भैय्यासाहेब मगर, प्रा. श्याम पवार, प्रदीप साळवी, प्रा. उदय देशपांडे, ईश्वर चिठ्ठी, वसुंधरा लांडगे, स्नेहा एकतारे, डॉ. महेश पाटील, बन्सीलाल भागवत, प्रा. विजय तुंटे, कांचन शाह, सोमनाथ ब्रह्मे, संदीप घोरपडे आणि के. व्ही. कुलकर्णी यांचा समावेश आहे.
डॉ. जोशी यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेल्या कार्यकारिणीकडून मराठी वाङमयाच्या प्रसारासाठी नवे उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांचे समर्थकांनी जल्लोषात स्वागत केले.




