रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने, हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण अंगीकारून शिवसेना पक्षाचे मुख्यनेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आदेशानुसार प्रवीण पुरुषोत्तम पाटील यांची युवासेना अमळनेर शहरप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ही नियुक्ती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि युवासेना जिल्हाध्यक्ष रोहित राधेश्याम कोगटा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पक्षश्रेष्ठींनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत प्रवीण पाटील हे शिवसेनेचा विचार जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि संघटन बळकट करण्यासाठी प्रयत्नशील राहतील, असा विश्वास वरिष्ठांनी व्यक्त केला आहे.
नियुक्तीनंतर अमळनेर येथील शिवसेना कार्यालयात प्रवीण पाटील यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. या प्रसंगी पक्षातील विविध पदाधिकारी, मान्यवर आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या कार्यक्रमास पालकमंत्री गुलाबराव पाटील, पारोळा-एरंडोलचे आमदार अमोल पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, वैद्यकीय सेना उत्तर महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र गवळी, तालुकाप्रमुख सुरेश अर्जुन पाटील, शहरप्रमुख संजय कौतिक पाटील, वैद्यकीय सेना तालुका प्रमुख प्रमोद शिंपी, माजी उपजिल्हाप्रमुख डॉ. राजेंद्र पिंगळे, उपतालुका प्रमुख भूषण कोळी, व्यापारी सेना शहरप्रमुख अमित ललवाणी, तालुका संघटक गजेंद्र जाधव, प्रसिद्ध प्रमुख अनिल पवार आणि अल्पसंख्याक शहरप्रमुख शोएब शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी प्रवीण पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




