रिपोर्टर नूरखान
अमळनेर -: शहरात मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शहरातील विविध भागांत कुत्र्यांनी नागरिकांना चावल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आज सकाळी शहरातील मुख्य भागात सुमारे दहा ते बारा कुत्र्यांचा एकच टोळका दिसून आला. लहान मुले, शाळकरी विद्यार्थी आणि वृद्ध नागरिक या मोकाट कुत्र्यांमुळे बाहेर पडण्यास घाबरत आहेत.
या वाढत्या समस्येकडे अमळनेर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, तसेच कुत्र्यांना पकडून त्यांच्यावर आवश्यक तो उपाययोजना करावी, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून करण्यात येत आहे.




