रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- दिनांक 23 ऑक्टोबर 2025 वार बुधवार रोजी बी.ए.पी.एस श्री स्वामिनारायण मंदिर अमळनेर येथे भाऊबीजेच्या शुभमुहूर्तावर पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्री स्वामिनारायण यांना 500 पेक्षा जास्त शुद्ध शाकाहारी व्यंजनांचा भोग लावण्यात आला. सनातन संस्कृती मध्ये दिपवाळीला अनन्य साधारण महत्त्व आहे या दीपोत्सवाच्या पर्वामध्ये कार्तिक शुद्ध प्रतिपदेला अन्नकुट महोत्सव साजरा करण्याची विविध ठिकाणी परंपरा आहे. बी.ए.पी.एस श्री स्वामिनारायण मंदिर अमळनेर येथे देखील दरवर्षी दिपवाळी नंतर भाऊबीजेच्या दिवशी अन्नकुट महोत्सव साजरा केला जातो. आज देखील बी.ए.पी.एस श्री स्वामिनारायण सत्संग यांच्या सर्व हरिभक्त यांच्या वतीने व संतांच्या वतीने विविध व्यंजनांचा महाभोग भगवंताला अर्पण करण्यात आला. या प्रसंगी पूज्य योगीस्नेह स्वामी व पूज्य अखंड मुनिस्वामी उपस्थित होते. पूज्य अखंड मुनीस्वामींनी व युवा हरिभक्त यांनी विविध थाळगान करून भगवंताला भोग अर्पण केला. याप्रसंगी अमळनेरचे विद्यमान आमदार श्री दादासो अनिल भाईदास पाटील तसेच अमळनेरचे माजी आमदार श्री शिरीष दादा चौधरी हे उपस्थित होते दोघांच्याही हस्ते भगवंताची आरती करण्यात आली. या प्रसंगी स्वामिनारायण सत्संगाच्या हरिभक्त यांच्यावतीने अन्नकुट महोत्सवा दर्शन करणाऱ्या भाविकांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते आजच्या दिवशी सुमारे बाराशे पेक्षा जास्त भाविकांनी भगवंताचे व अन्नकुट महोत्सवाचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला.




