- रणजीत राजे भोसले
Dhule Wahid kakar @9421532266
महाराष्ट्राचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे धुळे शहरांमध्ये मुक्कामी आले असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी निदर्शने करून आंदोलन केले व पत्ते व काळे झेंडे दाखवून राजीनामाची मागणी केली.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे धुळे जिल्हा दौऱ्यावर आले असताना रात्री धुळे शहरातील टॉपलाईन हॉटेल येथे मुक्कामी होते. विधान भवनामध्ये संसदीय कामकाज चालू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे रमी पत्त्याचा खेळ खेळत होते. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा चालू असताना पत्ता खेळणे हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी आहे. या विरोधामध्ये धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने धुळे दौऱ्यावर आलेले असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा हॉटेल समोर आंदोलन करून निदर्शने करून घोषणा बाजी देऊन निषेध व्यक्त केला. "परत जा, परत जा माणिकराव कोकाटे परत जा" "राजीनामा द्या, राजीनामा द्या माणिकराव कोकाटे राजीनामा द्या" अशा घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलबाहेर केल्या. यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पत्त्यांचे कॅट व काळे झेंडे घेऊन त्यांचे स्वागतासाठी रोडवर उभे होते. "जंगली रमी पे आओ ना महाराज" अशी हाक यावेळी रणजीत राजे भोसले यांनी दिली. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून दौऱ्याला विरोध केला. माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा द्यावा, धुळे जिल्हा दौरा करू नये अशा पद्धतीची मागणी यावेळी कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून हॉटेलचा परिसर धनकावून सोडला. यावेळेस मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या आंदोलनाच्या वेळी
रणजीत राजे भोसले, अमित शेख, मंगलदास वाघ, निखिल मोमया, वैभव पाटील, रामेश्वर साबरे, राजेंद्र चौधरी, शेख हुजेर, नुरुद्दीन शाह, राजू मशाल, समद शेख, रुबाब पिंजारी, राजू डोमाळे, जगन ताकते, सुनील अहिरराव, कुणाल वाघ अधिक कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.