रावेर. ईकरा शिक्षण संस्था जळगाव संचलित,अ. मजीद सालार इकरा उर्दू हायस्कूल बोरनार, मध्ये राष्ट्रीय भूगोल दिवस निमित्ताने प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात आली होती. भारताचे प्रसिद्ध भूगोलशास्त्रज्ञ प्रोफेसर चंद्रशेखर धोंडी राज देशपांडे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 14 जानेवारी रोजी ‘राष्ट्रीय भूगोल दिन’ साजरा केला जातो. सर्वप्रथम आरीफ मुहम्मद खान सर यांनी विद्यार्थ्यांना भूगोल दिनाविषयी सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांमध्ये भूगोल विषयाची आवड निर्माण करण्यासाठी या प्रश्नमंजुषेचे आयोजन करण्यात आले. होते, या प्रश्नमंजुषा स्पर्धेत इयत्ता आठवी ते दहावीच्या ३५ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला होता. प्रश्नमंजुषा मध्ये प्रथम क्रमांक तीन विद्यार्थी ने पटकावला १) जररीन सादिक खान(१० वि).२) सायमा रईस पटेल(९वि), ३) खदिजा सादिक देशमुख(८वि) यांनी तसेच दुसऱ्या क्रमांक वर विद्यार्थिनी दानिया रहीम देशमुख(९वि) होती. तसेच तिसऱ्या क्रमांकावर दोन विद्यार्थिनी होत्या १) आफिया अल्ताफ देशमुख(९वि),२) आफीया शेख मुख्तार (८वि) होते.भूगोल विषय समिती प्रमुख आरिफ मोहम्मद खान सर तर या समितीमध्ये सादिक मुस्तफा सर व मजहर खान सर होते. यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक शाह सलीम सर यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. या प्रश्नमंजुषा यशस्वी करण्यासाठी रोशन सर, फिरोज खान सर, जव्वाद सर, आबीद सर व अमीर सर यांचेही सहकार्य केले. तसेच शिक्षकेतर कर्मचारी आकीब सर (लिपिक) मुश्ताक भाई, युसुफ भाई, शब्बीर भाई यांनी सुद्धा सहकार्य केले. प्रश्नमंजुषा यशस्वी झाल्याबद्दल संस्थाध्यक्ष डॉ.अब्दुल करीम सालार यांनी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.