रिपोर्टर नूरखान
अमळनेर :- शहरात गेल्या काही वर्षांपासून हस्नैन करीम कल्याणकारी संघटना या संस्थेच्या वतीने आयोजित होणाऱ्या इज्तिमाई सामूहिक विवाह परिषद हे कार्यक्रम जरी स्तुत्य असले तरी, या संस्थेच्या आर्थिक पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
या संस्थेकडून दरवर्षी दहा ते पंधरा मुस्लिम जोडप्यांचे विवाह लावण्यात येतात. यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला जातो. परंतु, एवढा निधी संस्थेकडे कुठून येतो?, संस्थेचे पदाधिकारी कोण आहेत?, आणि त्यांचे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत?, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
आर्थिक पारदर्शकतेवर गंभीर शंका.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या संस्थेकडे मोठ्या प्रमाणावर देणग्या किंवा आर्थिक मदत गोळा केली जाते. मात्र, संस्थेचे अधिकृत रजिस्ट्रेशन, बँक खात्याचा तपशील, तसेच लेखा परीक्षणाचा Audit)अहवाल अद्यापही सार्वजनिक करण्यात आलेला नाही.
यावर्षी अमळनेरमध्ये सहावी इज्तिमाई विवाह परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळीही कोणत्याही स्वरूपात देणगीदारांची नावे, निधीची रक्कम किंवा खर्चाचा तपशील उपलब्ध करून देण्यात आला नाही.
संस्थेची चौकशी करण्याची मागणी. स्थानिक नागरिकांमधून आता ही मागणी जोर धरू लागली आहे की, हस्नैन करीम कल्याणकारी संघटनेची संपूर्ण चौकशी करण्यात यावी. ही संस्था राज्य शासनाकडे नोंदणीकृत आहे का? ती Income Tax Act अंतर्गत 80G / 12A मान्यता प्राप्त आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे देणे संस्थेला बंधनकारक आहे.
शिवाय, संस्थेचे पदाधिकारी कोण आहेत, त्यांच्या वैयक्तिक उत्पन्नाचे स्रोत काय आहेत, हे ही तपासणे गरजेचे आहे. समाजसेवेच्या नावाखाली लाखोंच्या निधीचा उपयोग कोणत्या हेतूने होतो, याची पारदर्शकता राखली जावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा, तसेच Charity Commissioner यांनी त्वरित लक्ष घालून तपासणी प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
जर संस्था खरंच पारदर्शक आणि समाजहिताची असेल, तर चौकशीला घाबरण्याचे काहीच कारण नाही. मात्र संशय निर्माण करणारी गुप्तता समाजात गैरसमज निर्माण करत आहे.